जत शहराच्या प्रश्नासंदर्भात नगरपरिषदेसमोर नगरसेवकाचे धरणे आंदोलन
जत : जत शहराच्या प्रश्नांसंदर्भात भाजपच्या वतीने नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन नगरसेवक गौतम ऐवाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. युवक नेते विक्रम ढोणे, शहराध्यक्ष आण्णा भिसे,नगरसेवक प्रकाश माने,माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत,संतोष मोटे यांनी सहभाग नोंदवला.यावेळी निवेदन नगरपरिषदेचे प्रशांत होनराव याना देण्यात आले.
हायमास्ट पोल टेंडर घोटाळ्याची चौकशी करावी, प्रभाग चार मधील मातंग गल्लीतील ट्रिमिक्स रस्ता सुरू करावा. शहरातील विविध प्रलंबित कामे अद्यापही प्रलंबित आहेत.ती त्वरित सुरू करण्यात यावी. हातपंपाच्या ठिकाणी सब मोटर्स जोडून टाक्या बसवाव्यात.शहरातील वाड्या वस्तीवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी नळ कनेक्शन देण्यात यावे.नगरसेवकांच्या नातेवाईकांचे कामातील लुडबुड बंद करावी,अशी मागणी करण्यात आली.