दरोडा,जबरी चोरीतील २ संशयित जेरबंद
सांगली : सांगली जिल्ह्यात दरोडा,जबरी व घरफोडी करणाऱ्या टोळीतील मुख्य संशयित आरोपी जेरबंद करून चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी उघडीस आणले आहेत.
याप्रकरणी महेश फिरास चव्हाण वय २१,रा.कोकणगाव,ता.श्रीगोंदा,रो हित उर्फ सोन्या दिपक काळे वय १९ रा.शिदा (ता.कर्जत)या संशयिताना ताब्यात घेतले आहे.संजयनगर,विटा,इस्लामपूर, तासगाव पोलीस ठाणे येथील प्रत्येकी १ असे चार गुन्हे उघडीस आले आहेत. पो.नि.सतीश शिंदे,सहा.पो.नि.संदिप शिंदे,उपनिरिक्षक विशाल येळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
