डफळापूरमध्ये लोकनियुक्त संरपचपदाचे अपक्ष उमेदवार हणमंत कोळी यांना प्रतिसाद

0

डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवार कॉ.हणमंत कोळी,प्रभाग १ च्या उमेदवार कॉ.मिना कोळी,वार्ड ६ चे उमेदवार गौस मकानदार यांनी घर टू घर प्रचारावर भर दिला आहे.त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

डफळापूर परिसरात विविध समाजिक प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठविणारे जनतेचे उमेदवार म्हणून कॉ.कोळी व त्यांचे दोन सहकारी निवडणूक लढवित आहेत.गेल्या १० वर्षापासून कोळी दांपत्य आशा,गट प्रवर्तक यांच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांना मोठा लाभ मिळवून दिला आहे.बांधकांम कामगार,विविध योजनांचा लोंकाना लाभ मिळवून दिला आहे. त्याशिवाय गावातील रस्ते,पाणी पुरवठा,गटारीसह अनेक सामाजिक विषयावर ते सातत्याने आवाज उठवित आहेत.

 

चळवळीतून तयार झालेले कॉ.कोळी दांपत्य व गौस मकानदार यांनी गावातील प्रत्येक वार्डातील घरोघरी जात आपल्या हक्कासाठी,उज्वल भविष्यासाठी,लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मतदान करावे,असे आवाहन करत आहेत.अपक्ष आहेत पण त्यांना मिळत असलेला पाठिंबा उल्लेखनीय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Rate Card

 

यावेळी कॉ.हणमंत कोळी,कॉ.मिना कोळी,गौस मकानदार,श्री.स्वामी हे प्रचारात कष्ठ घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.