व्हसपेटमध्ये हजरत दावलमलिक परिवर्तन पॅनलची प्रचारात आघाडी

0
माडग्याळ : जत पूर्व भागातील अतिशय अटातटीची रंगत आणणारी निवडणूक व्हसपेट ग्रामपंचायतची होत आहे.टोकाच्या प्रचार यंत्रणेमुळे गाव संवेदनशील बनले आहे.व्हसपेटमध्ये हजरत दावलमलिक परिवर्तन पॅनलची प्रचारात आघाडी घेतली असून सर्व उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आमच्या पँनेलच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांच्या पँनेल प्रमुखांनी केला आहे.व्हसपेट ग्रामपंचायत व्हसपेट व राजोबाची वाडीची एकत्रित ग्रामपंचायत आहे.सरपंच पदासाठी राजोबाचीवाडी व व्हसपेट असे दोन स्वतंत्र थेट उमेदवार उभे आहेत.
ग्रामदैवत दावलमलिक सत्तारूढ  पॅनेलचे थेट पदाच्या‌ उमेदवार सौ.पूनम तुराई या आहेत.तर हजरत दावलमलिक परिवर्तन पॅनलच्या‌ संरपच पदाच्या उनेदवार सखुबाई निळे यांच्यात सामना होत आहे.व्हसपेठ हे गाव दावलमलिक दर्गामुळे प्रसिद्ध असून जत-चडचण मार्गावरील या गावाचा अपेक्षित विकास झाला नाही.

 

आमचे पँनेल गावांच्या विकासाठी कठिबंध्द असून नागरिकां हितासाठी प्रयत्न करणार आहोत.त्यामुळे
Rate Card
हजरत दावलमलिक परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याचे विजयी करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

पॅनलचे नेतृत्व अंकुश हुवाळे,प्रकाश निळे, बिराप्पा निळे,सुखदेव साळुंखे,मुसा नदाफ ,आदिलशाह पाटील, प्रकाश घोदे हे नेतृत्व करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.