जत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान सुरू
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज जत तालुक्यात शांततेत मतदान सुरू आहे.डफळापूर, शेगाव,माडग्याळ, संख,उमदी अशा मोठ्या ग्रामपंचायतीसाठी चुरसीने मतदान सुरू आहे.
जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी त्यांच्या सुसलाद या गावी तर जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी त्यांच्या येळवी या गावी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळच्या सत्रात कुठेही वादाचे प्रकार समोर आलेले नाहीत.वाळेखिंडी येथे मशिनवर चिन्ह स्पष्ट दिसत नसल्याने काहीकाळ मतदान थांबले होते.