दहा वर्षानंतर डफळापूर ग्रामपंचायतीवर लोकनेते सुनिलबापू गटाचे वर्चस्व

जत तालुक्यातील मोठे नेते असलेले लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांच्या पश्चात त्यांचे चिरजिंव दिग्विजय चव्हाण, अभिजीत चव्हाण यांनी जनतेपुढे विकासाचे व्हिजन नेहत आवाहन केले होते.त्याला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत संरपच सह ८ सदस्य विजयी केले होते. आता उपसंरपचही बापू गटाचा झाल्याने तब्बल १० वर्षानंतर ग्रामपंचायतीवर सत्ता मिळाला आहे.

0
डफळापूर,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील महत्वाचे गाव असणाऱ्या डफळापूर ग्रामपंचायतीवर तब्बल दहा वर्षानंतर लोकनेते सुनिलबापू चव्हाण गटाचे संरपच,उपसंरपच पदासह सत्ता मिळाली आहे.

 

बुधवारी झालेल्या उपसरपंच निवडीत लोकनियुक्त सरपंचाच्या मताद्वारे सुनिलबापू गटाच्या मनिषा दिपक कांबळे या उपसरपंच झाल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणूकीत थेट संरपच सुभाषराव गायकवाड यांच्यासह ८ सदस्य तर विरोधी गटाचे ९ सदस्य निवडून आले होते.नव्या नियमानुसार लोकनियुक्त सरपंचाच्या दोन मताच्या अधिकारामुळे अखेर उपसंरपचही बापू गटाचा विजयी झाला आहे.ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या पहिल्या ग्रामसभेत मनिषा कांबळे यांची निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी रमेश खरात,सहा.निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत बामणे,ग्रामविकास अधिकारी संगाप्पा बसरगी यांनी काम पाहिले.

 

लोकनेते सुनिलबापू चव्हाण हे हयात असताना ग्रामपंचायतीवर पुर्ण बहुमताने सत्ता होती.त्यावेळी बापूनी मोठ्या ताकतीने डफळापूरसाठी विकास योजना आणल़्या होत्या.जिल्ह्यातील सर्वात मोठी पेयजल पाणी योजना ही त्यांच्याच पाठपुराव्याचे फलित होते.आता ही योजना पुर्णत्वाकडे आली आहे. पुढील ५० वर्षे गावभाग,वाड्यावस्त्यांची पाणीटंचाई यामुळे संपणार आहे.त्याशिवाय ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात महसूल मिळावा म्हणून भव्य व्यापारी संकुल बांधण्याचा त्यांचा संकल्प होता.मात्र त्यानंतर झालेल्या निवडणूकीत बापू गटाच्या पँनेलचा पराभव झाला होता.गतवेळीही संरपचपद विरोधी गटाकडे गेले होते. तर सदस्य संख्या जास्त असतानाही सत्तेने हुलकावणी दिली होती.

 

यावेळी मात्र त्यांचे चिरजिंव दिग्विजय चव्हाण व भाऊ अभिजीत चव्हाण यांनी प्रथमपासून अगदी योग्य नियोजन करत थेट सरपंचसह ८ सदस्य निवडून आणले होते.उपसरपंच निवडणूकीतही सर्वांना पद मिळावे यासाठी पँनेलच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला होती.त्यानुसार वार्ड नं.६ मधील मनिषा दिपक कांबळे यांची उपसरपंचपदी वर्णी लागली आहे.नियोजनानुसार अन्य सदस्यांनाही संधी दिली जाणार आहे.
लोकनियुक्त संरपच सुभाषराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली.यावेळी नवनिर्वाचित सदस्य हर्षवर्धन सुनिल चव्हाण,सावित्री कुमार दुगाणे,गणेश कुमार पाटोळे,उषा सुनिल संकपाळ,दिपा दिपक कोळी,मनिषा दिपक कांबळे,विकास दयानंद वाघमारे,कमल आण्णाप्पा कोळी उपस्थित होते.
Rate Card

 

पँनेल प्रमुख दिग्विजय चव्हाण, अभिजीत चव्हाण, बाळासाहेब चव्हाण आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.रमेश चव्हाण,सुनिल छत्रे,बाळासाहेब शांत,सुभाष पाटोळे,अजित माने,बाळासाहेब माने,दिपक चव्हाण,सज्जन हताळे, पप्पू वाघमारे,उमाजी वाघमारे,अजित गायकवाड,धनाजी चव्हाण, देवदास चव्हाण, अजित चव्हाण,राजकुमार भोसले,दिलीप भोसले,अशोक भोसले,अजित खतीब,वसंत चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विकासकामांना प्राधान्य राहिल
तालुक्यातील मोठे गाव असणाऱ्या डफळापूरमध्ये नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू,प्रामुख्यांने गावातील रस्ते दुरूस्ती व पाणी पुरवठा सुरळीत करण्यास आमचे प्राधान्य असेल.यापुढे ग्रामपंचायतीचा लोकहिताचा व पारदर्शी कारभार होईल.
– सुभाषराव गायकवाड,संरपच
समन्वय साधून विकास करू 
मतदारांनी आमच्या पँनेलवर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन.महिलांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करू प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न राहिल.
– मनिषा कांबळे,उपसंरपच
१० वर्षानंतर सत्तेत
जत तालुक्यातील मोठे नेते असलेले लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांच्या पश्चात त्यांचे चिरजिंव दिग्विजय चव्हाण, अभिजीत चव्हाण यांनी जनतेपुढे विकासाचे व्हिजन नेहत  आवाहन केले होते.त्याला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत संरपच सह ८ सदस्य विजयी केले होते. आता उपसंरपचही बापू गटाचा झाल्याने तब्बल १० वर्षानंतर ग्रामपंचायतीवर सत्ता मिळाला आहे.गावकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातीलचं,त्याशिवाय लोकांची ग्रामपंचायत असेल असा कारभार आमचे सदस्य करतील असे निवडीनंतर दिग्विजय चव्हाण व अभिजीत चव्हाण यांनी सांगितले.
 
 
डफळापूर येथे उपसंरपच निवडीनंतर मनिषा कांबळे व सुभाषराव गायकवाड यांच्यासह अन्य सदस्यांनी बापूच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.