पारदर्शी, लोकहिताचा कारभार करू | – चन्नाप्पा पट्टणशेट्टी | करजगीत संरपच, सदस्याचा सत्कार
करजगी(कल्लाण्णा बालगाव) : करजगी ता.जत येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त संरपच, व सदस्यांचा सत्कार सभारंभ संपन्न झाला.
संरपच चन्नाप्पा मल्लाप्पा पट्टणशेट्टी,सदस्य महांतय्या अण्णय्या मठपती, श्री.श्रीकांत हणमंता गुरव,सौ.अंबाव्वा गुरप्पा जेऊर,दिलशाद काशीमसा जुन्नेदी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,फेटा,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत हे सर्वजण विजयी झाले आहे.
संरपच चन्नाप्पा पट्टणशेट्टी म्हणाले,गावचे ऐतिहासिक महत्व जपण्याबरोबर गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबंध्द राहू,नागरिकांनी निसंकोच समस्या आमच्यापर्यत आणाव्यात,त्या सोडविल्या जातील,पारदर्शी लोकहिताचा कारभार आम्ही करू,असेही पट्टणशेट्टी म्हणाले.यावेळी पँनेल प्रमुख,कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.

वेदमूर्ती धानय्या हिरेमठ, रेवप्पा पट्टणशेट्टी (श्री सिद्धेश्वर संस्था चेअरमन), अब्दुल सत्तार जागीरदार(माजी उपसभापती), कल्लाप्पा नंदुर (सोसायटी सचिव),साहेबपाशा बिराजदार(माजी सरपंच),बशीरअह्ममद बिराजदार, (माजी चेअरमन), नूरअहमद पटेल, श्रीमंत सनदी,बसया हिरेमठ ,निलया मठपती, रामन्ना गुरव,महीबुबखादर बिराजदार, रुकमुद्दीन जुनेदी, किस्मत पटेल, धोंडाप्पा पट्टनशेट्टी,सायबणा जेऊर,गुरय्या नंदरगी, मल्लाप्पा पट्टणशेट्टी(माजी सरपंच),गुरु जेऊर, विरेश जेऊर ,दावल जातगार ,जंगप्पा जंगमशेट्टी, दादेफिर बिराजदार,सिद्धू गुरव,अशोक जेऊर, संगप्पा सायगाव,शिदराय पट्टणशेट्टी, महादेव पट्टणशेट्टी अंबण्णा कळी,अण्णाराय सालूटगी,
मुनाफ जागीरदार, हिरगेप्पा कोळी, शंकर गुरव, सिद्धाप्पा बामणे इराप्पा अक्कलकोट,राजू कोळी, अब्दुल मुजावर,अल्ताफ बिराजदार,धोंडाया मटपती,नबल्ला जागीरदार,आकाश जाधव, बाबू कांबळे,रमेश सायगांव , मल्लिकार्जुन अक्कलकोट,अरुण हिंदुस्तानी,प्रकाश कोरे, नागप्पा कट्टीमनी,सुरेश अक्कलकोट आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन महादेव नवराज तर आभार महांतय्या मठपती यांनी मानले.