माडग्याळ उपसरपंचपदी सविता सावंत 

0
जत,संकेत टाइम्स : तालुक्यातील माडग्याळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ.सविता सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सौ.अनिता माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी खोत, तलाठी भोसले आणि ग्रामसेवक चव्हाण यांनी काम पाहिले.
यावेळी सौ. सरपंच अनिता माळी म्हणाल्या,सर्वांशी समन्वय साधून विकास करू.आज खऱ्या अर्थाने माडग्याळच्या विकास पर्वाला सुरुवात झाली आहे. गावातील जेष्ठ अनुभवी नेते आणि यंग ब्रिगेडच्या साथीने गावचा विकासत्माक चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावाच्या नागरिकांना  पिण्यासाठी शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उत्तम शिक्षण, आरोग्यची उत्तम सुविधा मिळवण्यासाठी पदाचा योग्य वापर करणार आहे.

 

 

नूतन उपसरपंच सौ. सविता सावंत म्हणाल्या, सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विकासात्मक कामांच्या माध्यमातून माडग्याळ गावाला आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मतदारांनी आमच्या प्ननेलवर दाखवलेल्या विश्वासाला कधीही वाया जाऊ न देता गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करीन. महिलांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करु प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.