राजकारण विरहित समाजकार्य सुरूच ठेवणार | – तुकाराम बाबा

0
जत,संकेत टाइम्स : चांगले काम करताना टिका,टिप्पणी होतच असते त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत जतमधील सर्वसामान्य जनतेसाठी, जतच्या पाण्यासाठी आपला लढा हा सुरूच राहणार आहे. राजकारण विरहित समाजकार्याचा ध्यास घेवून आपण श्री संत गाडगेबाबांचे शिष्य,श्री संत बागडेबाबा यांच्या समाजकार्याचा वारसा जपत राजकारण विरहित समाजकार्य सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती व बाबा आश्रम यांच्या वतीने तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यातील विविध पत्रकारांचे सत्कार करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संखचे अप्पर तहसिलदार सुधाकर मागाडे आदी उपस्थित होते. यावेळी संतोष टेळेकर, दत्ता सावळे, संभाजी नलवडे उपस्थित होते.

 

 

अध्यक्षीय समारोपात बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, दुष्काळी जत तालुक्यात काम करताना पत्रकारांच्या माध्यमातून समाजातील दुःख, वेदना समजल्या. दुष्काळ, महापूर, कोरोना, अपघात, जळीत घटना समजतात. यावेळी आपण मानवतेच्या भावनेतून मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून समाजकार्य हाती घेतले. समाजातील शेवटच्या घटकापर्यत निस्वार्थपणे मदत पोहचली पाहिजे, समाजामध्ये दानशूरपणा वाढला पाहीजे,  समाजात जनजागृती व मदतीची भावना निर्माण झाली पाहिजे याच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण समाजकार्य केले व पुढेही भविष्यात करणार.
विरोधकांच्या टिकेला बाबांचे उत्तर
जतच्या पाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

 

पाऊण तास झालेल्या चर्चेत आपण मुख्यमंत्र्यांना जतच्या आठ तलावात कमी खर्चात, म्हैसाळ योजनेतून पाणी येवू शकते हे नकाशासह सांगितले तसेच विस्तारित योजना व जतच्या प्रलंबित विषयाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही भेटच अनेकांना खुपत आहे. पाण्यावरून यापूढे राजकारण चालणार नाही, स्वतःची पोळी भाजणार नाही हे लक्षात आल्याने काही राजकीय मंडळींनी तुकाराम बाबांचे योगदान काय असा सवाल उपस्थित करत आपणावर केलेल्या टिकेची बाबांनी खरपूरस समाचार घेतला. तुकाराम बाबा ज्यावेळी दुष्काळ, कोरोनात, नैसर्गिक आपत्तीत जतकरांना मदत केली त्यावेळी तुकाराम बाबा चांगले होते पण आता पाण्याचा मुद्दा संपणार म्हटले की माझ्यावर टिका केली जाते हे योग्य नाही. जतसाठी मी काम करतो राजकारणासाठी नाही हेही बाबांनी यावेळी स्पष्ट केले.
संख येथील बाबा आश्रमात पत्रकारांच्या सत्कार प्रसंगी बोलताना तुकाराम बाबा.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.