कामगार कल्याणकारी महामंडळामध्ये १५० कोटीचा भ्रष्टाचार | – महेश खराडे ; संबधितावर कारवाई न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा

0
सांगली,संकेत टाइम्स : कामगार मंत्र्याच्या सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामध्ये सुमारे 150 कोटीचा भ्रष्टाचार झाला असून भ्रष्टाचाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यावर कारवाई करावी,अन्यथा कामगार मंत्र्याच्या घरावर मोर्चा काढू,असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

 

खराडे यांनी महामंडळाकडे नोंदणीकृत कामगारांना मिळणाऱ्या अनुदानातून 50 टक्के अनुदान हडप करण्याचा धंदा सुरू केला आहे.या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी व एजंट यांच्या संगनमताने हा घोटाळा सुरू आहे.  महामंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगाराच्या विधवांना 2 लाख, घर बांधणीसाठी पाच लाख_मेडिकल खर्चासाठी 10 लाख रुपये,व्यावसायिक शिक्षणासाठी 60 हजार, महाविद्यालयीन शिक्षण 50 हजार, याशिवाय मध्यानभोजन आदीसह अन्य सुविधा दिल्या जातात.

 

या सुविधा आणि अनुदान मिळवून दिले की, त्यातील 50 ते 60 टक्के अनुदान एजंन्ट हडप करत आहेत. वाळवा तालुक्यात सलीम सय्यद हा एंजन्ट आणि त्याची संघटना असले उद्योग मोठ्या प्रमाणात करत आहेत.त्याने हबिर निर्मळ या मजुराला 2 लाख अनुदान मिळवून दिले आणि लगेच एक लाख त्याच्या खात्यावर वर्ग झाले.तांबवे व परिसरातील काही गावातील लाभार्थ्यांनी या बाबतीत सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत.पुरावे सादर केले आहेत,मात्र कोणतीही कार्यवाही होत नाही हे वास्तव आहे.या सर्व मंडळींना माजी मंत्र्याचा वरदहस्त आहे.

 

त्यामुळे बिनबोबाट हा धंदा सुरू आहे.त्यामुळेच आम्ही आज कामगार कार्यालयात जावून याबाबत विचारणा केली.मात्र सहायक कामगार आयुक्त  जागेवर नव्हते,सदर प्रकार बंद न झाल्यास कामगार आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकू असाही इशाराही खराडे यांनी दिला आहे.
लक्ष्मी महादेव निर्मळ या विधवा महिलेला  2 लाख रुपये मिळाले. त्यातील एक लाख रुपये सलीम सय्यद याच्या खात्यावर एक लाख तासात वर्ग झाले,कसे यांची चौकशी करावी,अशी मागणी खराडे यांनी केली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.