श्रीपती शुगर डफळापूरमुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटला

0
डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर कारखाना चालू झाल्याने अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सुटणार आहे.जवळच्या अन्य कारखान्याचे अधिकारी, ऊसतोड टोळीकडून शेवटच्या टप्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे आरोप होत होते.परिणामी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ऊस शिल्लक राहण्याची भिती व्यक्त होत होती.
ऊसाचे फडे पेटून ऊस नेहण्याचा प्रकार डफळापूर येथे यंदापासून सुरू झालेल्या श्रीपती शुगर कारखान्यामुळे बंद होत आहे.ऊस संपेपर्यत कारखाना चालू राहणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.ऊसाचे योग्य वजन,२८०० रूपये दर जाहिर केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

 

Rate Card
श्रीपती शुगर आता पुर्ण क्षमतेने सुरू झाला असून लगतच्या तालुक्यातील सर्व ऊस संपल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नसल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.