पलूसमध्ये सुपारी देऊन केलेल्या हत्येचा बनाव उघडीस | पाच जणांना अटक

0
पलूस : पलूसमधील दोघा प्रतिष्ठीत मंडळीनी पाच लाख रुपयांची सुपारी देवुन आपल्या जमीन व्यवहारात अडथळा ठरणाऱ्या विजय नाना कांबळे (रा.बांबवडे) याची हत्या घडवून आणल्याचे कारणावरुन पलूसमधील सुनिल केशव घोरपडे, अभयसिंह मोहनराव पाटील, घोगाव येथील रोहन रमेश पाटील, रुतीक भुपाल पाटील आणि भवानीनगर येथील संग्राम राजेंद्र पाटील
या पाच जाणांना पलूस पोलीसानी अटक करुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या २० जानेवारी रोजी दुपारी तीन वाजणेच्या दरम्यान पलूस न्यायालय ते पलूस पोलीस ठाण्याच्या
समोरील रस्त्यावर एका अज्ञात विना नंबरच्या चारचाकी गाडीने या रस्त्यावरुन चालत जात असलेल्या विजय नाना कांबळे यांना जोरदार धडक दिली होती. या घटनेनंतर सदर गाडी कुंडलच्या दिशेने निघून गेली होती.या अपघातानंतर पलूस
पोलीसानी विजय कांबळे या जखमीस पलूसच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

 

त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
या अपघातानंतर पोलिसानी गुन्हा अज्ञाताविरोधांत दाखल करणेत आला होता.हा तपास करीत असताना पलूस पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडली असतानाही कोणताही पुरावा नसताना या अपघातास कारणीभुत असणाऱ्याचा शोध घेणे पलूस पोलिसाना अवघड झाले होते. दरम्यान हा घात की अपघात अशी चर्चा पलूस परिसरात छुप्या
पध्दतीने सुरु झाली होती. या घटनेचा छडा लावणे पलूस पोलिसांसमोर आव्हान बनले होते. मात्र पलूस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळूंखे यानी अत्यंत शांतपणे या घटनेचा अभ्यास
करुन पलूस पोलिस ठाणेच्या परिसरातील सर्व सीसी टीव्ही फुटेज, तासगाव कराड रस्त्यावरील आजुबाजुच्या दुकानांत असलेल्याल सीसी टीव्ही फुटेजचा अभ्यास करुन विनानंबरच्या गाडीचा शोध लावला आणि ती गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले, त्या गाडीचा नंबर (एम एच ०९ डीएम ४०४१) असा असल्याचे निष्पन्न झाले.

 

 

Rate Card

सदर गाडी मालकाचा शोध घेतल्यानंतर त्याने ही गाडी भवानीनगर येथील संग्राम पाटील

याला दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात दोन वर्षापुर्वीच वापरणेस दिल्याची माहिती उघड झाली. सदर गाडी चालकास ताब्यात घेवुन केलेल्या चौकशी दरम्यान पलूसमधील अभय आणि सुनिल यांच्याशी त्याचे असलेले संबध आणि त्यांना त्रासदायक ठरणाऱ्या विजय कांबळे याच्या अंगावर गाडी घालणेची सुपारी घेतल्याचे त्याने पोलीस तपासात कबुल केले. यात त्याला घोगावच्या रुतीक आणि रोहन यांची मदत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि या सर्वाचा पलूसमधील अभय व सुनिल या जमीन व्यवहार करणाऱ्यांशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या सर्वाना गुरुवारी पलूस पोलिसानी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर हत्येचा कट रचणे, पुरावा नष्ट करणे, संगनमत करुन जीवे मारणे वगैरे प्रकारच्या कलमांखाली गुन्हा दाखल
करणेत आला असल्याची माहिती सपोनि प्रवीण साळुंखे यानी दिली.

 

या सर्वाना पलूस न्यायालयासमोर हजर केले असता त्याना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.अपघाताचा बनाव करुन आपल्या वाटेतील अडथळा ठरणाऱ्याचा काटा काढणाऱ्यांचा हा प्रकार उघडकीस येणेकामी सांगली जिल्हा पोलिस प्रमुख बसवराज तेली, अतिरीक्त अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलिस ठाण्याचे
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र धुमाळे,महिला उपनिरीक्षक राजश्री दुधाळे, प्रवीण पाटील, दिलीप गोरे, राकेश भोपळे, संजय गलुगडे, प्रमोद साखरपे, प्रवीण मलमे, गणी पठाण, अमोल कदम यानी अत्यंत कौशल्याने तपास केला आहे.

 

घटना घडल्यानंतर अवघ्या वीस दिवसांच्या आत कोणताही पुरावा नसताना आपले पोलिसी कौशल्य वापरुन गुन्ह्याची उकल करणाऱ्या पलूस पोलिसांचे परिसरांत कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.