डफळापूर,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मन्सूर खतीब यांना वाढदिवसानिमित्त येथे निवासस्थानी तसेच कार्यालयात, शाळेत व बसवेश्वर पतसंस्थेत जत तालुका, जिल्ह्यासह राज्यभरातील राजकीय, सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांसह जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
मराठी मुलांची शाळेत वाढदिवसानिमित्त पेन व वह्यांचे वाटप करण्यात आले. बसवेश्वर पतसंस्थेत उत्साहाच्या वातावरणात केक कापून वाढदिवस करण्यात आला.खतीब यांनीही शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांना वेळ देऊन आपुलकीने शुभेच्छा स्वीकारल्या. प्रत्येक कार्यकत्याला सामान्य नागरिकांना खतीब यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याची संधी देण्यात आली.
खतीब यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,जिल्ह्यातील आमदार, खासदार व शासकीय अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जिल्ह्यातील अधिकारी,कर्मचारी,जत पश्चिम सर्वच गावातील पदाधिकारी,कार्यकर्ते आदींसह नेते मंडळींनी संदेश व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापक व शिक्षक जत पश्चिम भागातील सरपंच, उपसरपंच,सोसायट्यांचे अध्यक्ष,
बाजारपेठेतील व्यापारी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मन्सूर खतीब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पेनचे वाटप करण्यात आले.