अनिल इंगवले यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार जाहीर | रविवारी पुणे येथे होणार मान्यवरांच्या हस्ते वितरण
सांगोला : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रभक्ती जनविकास संघटना भारत यांच्यावतीने राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांना नुकताच जाहीर झाला.रविवार पुणे येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

वित्तीय क्षेत्र, दुग्ध व्यवसाय, कृषीपूरक क्षेत्र, कापड व्यवसाय, मोटार्स अशा अनेक उद्योगांच्या माध्यमातून आजवर शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध केला असून हजारो कुटुंबांना संस्थांच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावलेला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा आवाका देखील खूप मोठा आहे. त्यांना सहकाररत्न,उद्योगरत्न यासारख्या अनेक पुरस्कारांनी यापूर्वी देखील सन्मानित केले आहे.सहकाराचा सखोल अभ्यास, वित्तीय क्षेत्रातील उठावदार कार्य व सामाजिक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.