दुर्दैवी घटना | पिकाला पाणी पाजत असलेल्या शेतकऱ्यांचा सर्पदंशाने मृत्यू

0

आटपाडी,संकेत टाइम्स : आटपाडी तालुक्यात दुर्दैवी घटना घडली असून पिकाला पाणी पाजत असलेल्या शेतकऱ्यांला सर्पाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. भागवत दत्तू डुबुले (वय ४८,रा.तडवळे ता.आटपाडी) असे शेतकऱ्यांचे नाव आहे.घटना गुरुवारी मध्यरात्री घटली आहे.

 

तडवळेचे तरुण शेतकरी भागवत डुबुले हे दरवेळीप्रमाणे वीज असल्याने गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.त्या दरम्यान त्यांना विषारी सर्पांने दंश केला.शुक्रवार सकाळी त्यांच्या पत्नी मालाबाई या पती भागवत यांना चहा घेऊन शेतात गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर लगतचे नागरिक जमा झाले.शेतकरी भागवत यांना तातडीने आटपाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले,मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Rate Card

 

दरम्यान कष्टाळू तरुण शेतकऱ्याचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.तडवळे येथील प्रसिद्ध कीर्तनकार अनिल महाराज यांचे भागवत डुबुले हे वडील होते.शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.