श्री संत गजानन महाराज अद्भुत दैवी शक्ती   

0

श्री संत गजानन महाराज अद्भुत दैवी  शक्ती.     श्री संत गजानन महाराजांची महिमा अपरंपार आहे ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.त्यामुळेच त्यांना ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज असे संबोधले जाते.कारण त्यांची महिमा संपूर्ण ब्रम्हांडात प्रचलित असल्याचे दर्शविते. आज जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर आपल्या लक्षात येईल की भारतात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. कारण महाराष्ट्रात अनेक थोर संत,महात्मे झालेत त्यातलेच संत गजानन महाराज आहेत.आपल्याला गजानन महाराजांचे अनेक चमत्कार  दिसून येतात.त्याचप्रमाणे संपूर्ण भारतात शांततेचे प्रतिक म्हणून शेगावचे गजानन महाराजांचे मंदिर प्रसिद्ध आहे. संत गजानन महाराज दिनांक २३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगावमध्ये तारूण्याअवस्थेत प्रगत झालेत.आज संपूर्ण भारतात श्री संत गजानन महाराजांमुळे महाराष्ट्रातील शेगाव हे गाव प्रसिध्दीस आले.साधु देविदास पातूकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्राळीतील अन्नाचे कण वेचून खात होते व गाईगुरांकरीता पिण्यासाठी ठेवलेले पाणी पिऊन निघून गेले.ते पुढे बार्शी येथील ब्रम्हनिष्ठ श्रीगोविंद महाराज टाकळीकर यांचे शेगावी महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले. त्याप्रसंगी टाकळीकरांच्या बेफाम असलेल्या घोड्यांच्या चौपायांत श्री गजानन महाराज हे ब्राह्मानंदी निमग्न होऊन निजलेले आढळले परंतु तुफान घोडा शांत झाला. अशाप्रकारे तुफान घोड्याला गजानन महाराजांनी शांत केले.तत्काळ गोविंदमहाराजांनी संत गजानन महाराजांची योग्यता ओळखुन भक्तीभावाने पूजा केली व त्यांची महती शेगाव निवासी लोकांना सांगितली. तेव्हापासुनच संत श्री गजानन महाराजांची प्रसिद्धी झाली.यानंतर महाराजांचे अनेक चमत्कार लोकांना दिसून आले. बंकटलाल अग्रवाल यांना गजानन महाराज प्रथमच दिसले असता “गण गण गणात बोते” असे उच्चारत त्यांचे भजन नेहमीच सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.