जेवनानंतर ४५ मिनिट व्यायाम सदृढ आरोग्यासाठी गरजेचा

0
जत,संकेत टाइम्स : लठ्ठपणा हा फक्त वजनाशी निगडित नसून शरीराची चयापचय क्रियेशी (मेटाबॉलिझम) निगडित आहे.आरोग्य म्हणजे स्थूल मानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक, संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक, दृष्ट्या सक्षम असते, ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून कार्यात्मक योग्यता हा स्वास्थ्याचा मुख्य निकस आहे,असे उद्गार आहार तज्ञ वंसुधरा पवार- चव्हाण यांनी काढले. जत येथील विवेक बसव प्रतिष्ठान आयोजित विवेकानंद जयंती प्रित्यर्थ आरोग्य विषयक व्याख्यान मध्ये सौ.पवार-चव्हाण बोलत होत्या.

 

येथील विवेक बसव प्रतिष्ठान कडून दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत विविध तज्ञाची व्याख्याने आयोजित केली जातात.आतापर्यत ह्रदयरोग तज्ञ डॉ.रविकांत पाटील,मधुमेह तज्ञ डॉ.चैतन्य बुवा,मानसिक आजार तज्ञ डॉ.चारूदत्त कुलकर्णी, मेंदू रोग तज्ञ डॉ.अश्विनीकुमार पाटील आदी डॉक्टरांची व्याख्याने घेण्यात आली आहेत.यंदा पुणे येथील डॉ.वसुंधरा पवार-चव्हाण यांचे लठ्ठपणा आणि आहार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

 

डॉ.पवार-चव्हाण पुढे म्हणाल्या,आपल्या जेवणात सँलड म्हणजे काकडी,गाजर,मुळा असे पदार्थ हवेत,त्याचबरोबर गोड पदार्थ निम्म्याहून कमी असावेत.जेवनानंतर प्रत्येकांनी ४५ मिनिटे व्यायाम केला पाहिजे,आणि ६ ते ७ तास निश्चित झोप घेतली पाहिजे. धन्यवाद देण्याची वृत्ती बाळगून ताण,तणाव कमी केला पाहिजे.अवेळी सांध्यांची झीज होणे, अतिवजनामुळे गुडघेदुखी, पाठीच्या मणक्यावर येणारा ताण, पायावर सूज येणे, व्हॅरीकोज व्हेनिस – पायावरच्या शिरा फुगणे आणि हिरव्या आणि निळ्या होणे, हर्निया तयार होणे.असे आजार लठ्ठपणामुळे येतात.

 

विविध प्रकारचे आजार किंवा वजनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी हे नेहमीच्या आहारात असणे आवश्यक आहे. आहारात स्थानिक भाज्या, फळांचा समावेश असावा.आहारात तेल, तेलबिया आणि मांसाहारी पदार्थाचा वापर शक्यतो कमी असावा. तसेच तेल, तूप, लोणी, वनस्पती तूप यांच्या वापरावर नियंत्रण असावे. काही मूलघटकांचे रक्तामध्ये शोषण होण्यासाठी स्निग्ध पदार्थ उपयुक्त असतात. स्निग्ध पदार्थामुळे भूक भागल्याची भावना वारंवार निर्माण होते. आहारामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असल्यास कोलॅस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आजार बळावण्याचा संभव असतो.लठ्ठपणा आणि वजनवाढ रोखण्यासाठी जास्तीचे खाणे टाळावे.
अधिक प्रमाणात तळलेले पदार्थ, मांसाहारी पदार्थ, तेलकट पदार्थ, जंकफूड खाल्ल्यामुळे चरबी अधिक वाढण्यास मदत होते. त्यामुळे स्थूलत्व येते.योग्य वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोजचा व्यायाम, शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे,असेही डॉ. पवार-चव्हाण म्हणाल्या.

 

यावेळी प्रमुख पाहुऩे म्हणून प्रमोद पोतनीस यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी,सचिव डॉ.सरिता पट्टणशेट्टी, यांनी प्रास्ताविक केले.न्यायाधीश श्री.चौगुले,अँड.श्रीपात अष्टेकर,श्रीमती जोत्सनाराजे डफळे,नगरसेविका सौ.दिप्ती सावंत,डॉ.हरिष माने,डॉ.स्वाती माळी,सुरेश पट्टणशेट्टी, राजेंद्र आरळी,आदि मान्यवर उपस्थित होते.अँड.रमेश मुंडेचा यांनी सुत्र संचलन केले,रुचा ‌पाठक यांनी व्याख्यानाचा परिचय दिला,श्री.कोरे यांनी आभार मानले.
जत येथील लठ्ठपणा आणि आहार या विषयावरील व्याख्यानत बोलताना डॉ.वसुंधरा पवार-चव्हाण,व मान्यवर
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.