ग्रामसेविकेच्या बदलीच्या आश्वासनानंतर आंवढीकरांचे उपोषण मागे

0
माजी आमदार विलासराव जगताप,बाबासाहेब कोडगसह अनेकांचा पाठिंबा
जत,संकेत टाइम्स : आंवढी ता.जत‌ येथील ग्रामसेविकेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी आंवढी (ता.जत) येथील ग्रामस्थांनी सोमवारी जत पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले आहे.दरम्यान दुपारी जत पंचायत समितीचे कक्ष अधिकारी श्री.मुल्ला, विस्तार अधिकारी कुंभार,श्री.चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण कर्त्यांबरोबर चर्चा केली. तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन चार्ज यादिप्रमाणे दप्तर ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करुन त्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवू असे सांगितले व ग्रामसेविका शिंदे यांची बदली करुन दुसरा ग्रामसेवक त्वरीत देण्याचे मान्य केले.यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण समाप्त केले आहे.

 

तालुका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे,ग्रामसेविका या गावच्या विकासात हयगय करतात.नियमित हजर राहत नाहीत.प्रोसिडिंग लिहित नाहीत.यासह अनेक बाबतीत ग्रामस्थांनी सन २०२० पासून सातत्याने जिल्हा परिषद,पंचायत समिकीकडे तक्रारी केल्या आहेत.तरीही कारवाई झालेली नव्हती.नुकतीच ग्रामस्थांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे ३ फेंब्रुवारीला पुन्हा लेखी तक्रार करत ग्रामसेविका यांची चौकशी करून बदली करण्याची मागणी केली होती.याचाच राग मनात धरून शिंदेनी ग्रामस्थ राजेश कोडग यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे गावात भितीचे वातावरण आहे.संबधित ग्रामसेविकेवर कारवाई करून बदली करावी,अशी मागणी निवेदनात केली आहे.माजी आमदार भाजपाचे नेते विलासराव जगताप, पं.स.जतचे सभापती बाबासाहेब कोडग, जि.प.सांगलीचे माजी सभापती सुनिल पवार, शिवसेना ठाकरे गटाचे संजीवकुमार सावंत, सरदार पाटील,काँग्रेस ओबीसी सेलचे तुकाराम माळी,निगडीचे नेते प्रकाश ईंगवले यांनी आंदोलनाला पांठिबा दिला.

 

यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन माणिक पाटील, माजी उपसरपंच प्रदिप कोडग, माजी उपसरपंच अनिल कोळी, उपसरपंच आमोल पाटील, हणमंत कोळी,भारतमहाराज कोडग,हरिदास कोडग, महेश कोडग, अंकुश शिंदे,बबन पाटील, पै.अरुणदादा कोडग, विनायक कोडग, श्रीकांत कोडग, रामचंद्र कोडग सर, पोपट कोडग, तानाजी गेजगे, सदस्य लक्ष्मण गेजगे, आण्णासो भाऊसो बाबर, सतिश कोडग, नितिन कोडग, सुर्यकांत कोडग, सुरेश कोडग , किसन कोडग, बाबासो एडगे, साहेबराव कोडग , महेश काशीद, हिम्मत कोडग, मारुती माने, भागवत तोरणे, बबन कोडग, रघुनाथ कोडग आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
आंवढीतील ग्रामसेविकेवर कारवाईसाठी ग्रामस्थानी उपोषण केले.यावेळी माजी आमदार विलासराव जगताप,बाबासाहेब कोडग,सजिंवकुमार सांवत,सुनिल पवार आदी
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.