अपघात वाढलेत,जत तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करा 

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे. जत तालुका हा विस्ताराने मोठा तालुका असून
आरोग्य सुविधा तोकडी असून, एखादा अपघात झाल्यास उपचारासाठी रुग्णांना
सांगली, मिरजला, जावे लागते व जत तालुक्यात ट्रामा केअर सेंटर सुरू केल्यास जत येथे अपघातग्रस्त रुग्णावर तातडीने उपचार होईल व त्या रुग्णाचा जीव वाचेल. सांगली,मिरजला जाणारा वेळ वाचेल.

 

ट्रॉमा केअर सेंटरसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर ते सुरू करावे,त्याचबरोबर आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असून ती तातडीने भरावीत अशी मागणीआमदार विक्रमसिंह सावंत यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.यावर
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ट्रॉमा केअर सेंटरसाठी निधी उपलब्ध करून देऊन जत तालुक्यात लवकरात लवकरामा केअर सेंटरला मंजूरी देऊ असे
आश्वासन देण्याबरोबरच आरोग्य विभागातील रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्यात येईल असे यावेळी सांगितल्याचे आ.सांवत म्हणाले.
जत तालुका विस्ताराने मोठा असून अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.
एखादा रुग्ण गंभीर दुखापतग्रस्त झाल्यास त्याला वेळेवर उपचार मिळणे जरुरीचे आहे. गंभीर रूग्णाला उपचारासाठी सांगली, मिरज येथे उपचारासाठी न्यावे लागते.यासाठी तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटर सुरू केल्यास अपघातग्रस्त रुग्णावर वेळेवर उपचार होतील,असे आ.विक्रमसिंह सावंत यांनी आरोग्यमंत्री सांवत यांनी यावेळी सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.