मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जतेत होणार नागरी सत्कार

0
प्रकाश जमदाडे यांची माहिती ; विस्तारित म्हैसाळ योजना मार्गी लावल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे मार्चमध्ये आयोजन
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील म्हैसाळ सिंचन योजनेपासून मल्लाळपासून ४७ गावे पुर्ण वंचित तर १७ गावे अंशत:वंचित असल्याने या गावांसाठी कामाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करावी,अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन केली.यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत,खासदार संजयकाका पाटील,वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

आज (ता.१५) रोजी जमदाडे यांनी सह्याद्री गेस्ट हाऊस मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.जत तालुक्यातील ६५ वंचित गावासाठी असणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजना मंजूर करून आरग येथून तिसऱ्या टप्यातून पाणी उचलून जत तालुक्यातील मल्याळ येथे येईपर्यतच्या कामाची ९८१ कोटीची निविदा प्रसिद्ध करून ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल जत तालुक्यातील सर्वपक्षीय व नागरिकांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जाहिर नागरी सत्कार सोहळ्यास वेळ देण्याची विंनती यावेळी जमदाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.मल्याळपासून पुढे पुर्णत: वंचित ४८ गावे तर अंशत:वंचित १७ गावासाठी असणाऱ्या योजनेसाठी निविदा प्रसिद्ध करावी,अशीही मागणी जमदाडे यांनी केली.

 

जत तालुका सर्वात मोठा असल्याने शिक्षण,आरोग्य,पशु संवर्धन,कृषी,पोलीस या विभागात रिक्त असलेल्या जागा तातडीने भराव्यात.२०२२ च्या अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या रस्ते कामावरील स्थगिती उठवून कामे मंजूर करावीत, अशीही मागणी जमदाडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.जत येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यासह केंद्रिय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री जयंत पाटील,उद्योग मंत्री उदय सामंत,खा.‌संजयकाका पाटील,आ.विश्वजीत कदम,आ.महादेव जानकर,योगेश जानकर,नितीन बानगुडेपाटील,जलसंपदाचे अधिकारी व पत्रकार बांधवांचे यावेळी सत्कार करण्यात येणार आहेत.
मार्चमध्ये भव्यदिव्य सत्कार सोहळा होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्च महिन्यात जतला येण्याचे मान्य केले असून भव्य नागरी सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अनेक खात्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत,असे प्रकाश जमदाडे यांनी सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.