जत,संकेत टाइम्स : जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवार ता.१७ फेब्रुवारीला सायंकाळी ६.०० वाजता लोकार्पण होणार आहे.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण पालकमंत्री तथा कामगार, समाजकल्याण मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याहस्ते तर माजी मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
यावेळी खा.संजयकाका पाटील,माजी मंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री शिवाजीराव नाईक,माजी मंत्री अजितराव घोरपडे,आमदार मोहनशेठ कदम,विक्रमसिंह सावंत,अनिल बाबर,मानसिंग नाईक,गोपीचंद पडळकर,सुधिर गाडगीळ,राजेंद्र देशमुख,सदाशिव पाटील,पृथ्वीराज देशमुख,विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
लोकार्पण सोहळा भव्य होणार आहे.सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले आहे.