घरगुती काढणी करूनही ज्वारी परवडेना ! | तालूक्याच्या काही भागातच पिक; मजूरांचा खर्च परवडेना

0
Rate Card
जत,संकेत टाइम्स : ज्वारीची काढणी, मोडणी, बांधणी तसेच गंजी लावण्यापर्यंतचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना स्वत:च्या शेतातील कडब्याची गंजी लावण्यासाठी शेकडा 2000 रूपयांपर्यंत खर्च येत आहे.तर खर्चामुळे ज्वारी पिक परवडनासे झाले आहे.जत तालुक्यात यंदा चांगला पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाबरोबर रब्बीतील मोठ्या प्रमाणावर ज्वारीचा पेरा करण्यात आला. त्यातून ज्वारीबरोबर कडबा येत असल्याने लागवड क्षेत्र कायम आहे. ज्वारी काढणी, बांधणी, मोडणी गोळा करण्यासाठी लागणार्‍या खर्चाने पेंडीला किमान किमान दहा रुपये मोजावे लागत असल्याचा घरचा चारा असला तरी तो विकतच घेतल्यागत झाला आहे.

जत तालूका ज्वारीचे पिक घेण्यात आघाडीवर असायचा मात्र पाऊसाने बगल दिल्याने व पेरणीनंतर पाऊस न झाल्याने काही भागातच ज्वारी पिक बऱ्याप्रमाणात आले आहे.माळरान,कोरडवाहू जमिनीत पाण्या अभावी दोन फुटापर्यत पिके येऊन वाळून गेल्याने तेथे धान्य वैरण तुटवडा आहेच.सर्वाधिक ज्वीरी उत्पन्न येणाऱ्या डोन परिसरात अपेक्षित पिकेच आली नाहीत.मजुरी तर एका बाजूला, पुर्ण दिवस पाचशे तर अर्धा दिवसासाठी चारशे रुपये वर मोजावे लागले; मात्र त्याच्या मोबदल्यात दिवसभरात अवघी 60 ते 70 व अर्धा दिवसात 40 ते 50 पेंडीही निघत नाही. त्याला बांधणीसाठी एका पेडींला तीन रुपये मोजावे लागतात.मोडणीसाठी किमान एक ते दीड रुपये, तर पाचूद्यावरील ही पेंडी गंजीपर्यंतच्या प्रवासाला कमीत कमी दहा रुपयांपेक्षा जास्त खर्च करावे लागतात.याशिवाय गोळा झालेला कडबा गंजीला लावण्यासाठी नाही म्हटले तरी त्यासाठी दीड ते दोन रुपये खर्च झाला.

अशा प्रकारे आपल्याच शेतात तयार झालेला; परंतु या खर्चातून तो हजार ते बाराशे रुपये शेकडा पडल्याने विकतचा चारा घेतल्यागत झाले असल्याचे शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत.खर्च व उत्पन्नाचा लेखाजोखा केलाच तर शेतकर्‍यांच्या हाती काय शिल्लक राहते, असा प्रश्न निर्माण होतो.ज्वारी दरावरच शेतकऱ्याचे पुढील अर्थकरण ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.