कोळगिरी तलावात अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचा सापळा

0
जत,संकेत टाइम्स : कोळगिरी (ता. जत) येथील एका तलाव पात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मानव सदृश्य मृतदेहाचा (हाडाचा) सापळा आढळून आला आहे. हा सापळा मंगळवारी (दि. २१) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास काराजनगीचे पोलीस पाटील श्रीकांत सुदाम सावंत यांना दिसल्याने त्यांनी जत पोलिसात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू अशी माहिती दिली आहे. हा सापळा स्त्री जातीचा आहे का पुरुष जातीचा आहे अद्याप समजले नाही. रात्री उशिरा पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी, कोळीगीरी ते निगडी खुर्द या रस्त्यालगत काराजनगी हद्दीलगत व कोळगिरी मध्ये एक पाझर तलाव असून या तलावात मृतदेहाचा सापळा असल्याचे काराजनगीच्या सरपंच संगीता लेंगरे यांना माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबतची कल्पना पोलीस पाटील सावंत यांना दिली. यानंतर सरपंच लेंगरे व पोलीस पाटील सावंत घटनास्थळी पाहणी केली यावेळी त्यांना सापळा दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती जत पोलिसात दिली. त्यानंतर जत पोलिसांची एक टीम व वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी हजर झाले. रात्री उशिरापर्यत तपास सुरू होता.
सदरच्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला? व्यक्ती कोण आहे? याबाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत. या घटनेने काराजनगी व कोळगिरी परिसरात खळबळ उडाली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.