संखचे किरण पाटील शिक्षण सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी

0
Rate Card
जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्था लिमिटेड सांगली पतसंस्थेच्या चेअरमनपदी संख येथील गुरूबसव विद्यामंदिर व ज्यू कॉलेजचे किरण रावसाहेब पाटील(सर) यांची बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर डीसीपीएस/एनपीएस संघर्ष समिती कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष तथा गर्ल्स हायस्कूल कवठेमहांकाळचे  नानासाहेब शेजाळ (सर) यांची व्हाईस चेअरमनपदी व आरग हायस्कुल आरगचे

निशांत विठ्ठल जाधव (सर)यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली.

 

दिनांक 29 जानेवारीला झालेल्या शिक्षण सेवक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत आमदार अरुण(आण्णा)लाड व डॉक्टर आर के पाटील (सर) यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शी पुरोगामी पॅनेलने सर्वच्या सर्व १७ जागा जिंकत एकतर्पी दणदणीत विजय मिळविला होता.आज (ता.२२)चेअरमन निवडीची बैठक सांगली येथे पार पडली.या बैठकीस सर्व नूतन संचालक,पँनेल प्रमुख,आजी- माजी पदाधिकारी, सुकाणू समितीचे पदाधिकारी व शाखेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

यावेळी संख येथील डॉ.आर.के.पाटील शिक्षण समुहाची प्रमुख जबाबदारी असलेले अनुभवी किरण पाटील सर यांच्यावर चेअरमन पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.निवडीनंतर संखमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला.
शिक्षकांच्या अडचणी सोडवून पतसंस्थेचा लौकिक वाढवू
माध्यमिक शिक्षकांचा आर्थिक आधार असलेल्या सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदाची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे.दिलेला पदाला न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहिल.त्याशिवाय माध्यमिक शिक्षकांच्या अडचणी सोडवून पतसंस्थेचा लौकिक वाढविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्नशील राहू.
– किरण पाटील सर
चेअरमन,शिक्षण सेवक पतसंस्था सांगली
शिक्षण सेवक पतसंस्था सांगलीच्या चेअरमन किरण पाटील,व्हा.चेअरमन नानासाहेब शेजाळ,सचिव निशांत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.