अचकनहळ्ळीतील शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी उपोषण

0
जत,संकेत टाइम्स : अचकनहळळी येथील वहिवाट असलेला खुला रस्ता पोखरला आहे. सर्व्हे क्रमांक ६ मधून जाणारा रस्ता पांडुरंग शिंदे यांनी अडविला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सध्या येण्या जाण्यासाठी मोठा निर्माण अडथळा झाला आहे. प्रशासनाने हा रस्ता खुला करावा यासाठी १६ शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र रस्ता खुला झाला नसल्याने तहसिल कार्यालयासमोर मंगळवार पासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाला भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांनी प्रत्यक्ष भेट देत पाठींबा दिला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, अचकनहळळी येथील तेरा शेतकऱ्यांनी वहिवाटीचा रस्ता मिळावा यासाठी तहसीलदाराकडे अर्जाद्वारे मागणी केली होती.याबाबतचा पंचनामा तहसीलदार यांच्यासमोर ३० डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आला होता.
या पंचनाम्यात सदर रस्त्यात कोणताही अडथळा केला असल्याचे दिसून आले नाही व हा रस्ता वहिवाट करण्यास खुला असल्याचे दिसून येते असा उल्लेख करण्यात आला होता मात्र पुन्हा हा रस्ता अडविला असून तो खुला करण्यासाठी
शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन जत तहसीलदार यांना सोमवार दि. २० फेब्रुवारीला दिले. याबाबत तहसीलदारांनी मंडळ अधिकारी
यांना अंतिम निकाल होईपर्यंत तात्पुरता रस्ता खुला करून देण्यात यावा व अर्जदारांना उपोषणापासून परावृत्त करावे असे आदेशात म्हटले आहे. मात्र याबाबत काहीच कार्यवाही झाली नसल्याने अचकनहळळी येथील शेतकऱ्यांनी‌ आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर १३ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.