डफळापूरात दोन घरे फोडली,पावनेपाच ‌लाखाची रोखड लंपास

0
डफळापूर ,संकेत टाइम्स ल: डफळापूर येथे चोरट्यांनी बाहेरून कुलूप लावलेली दोन घरे फोडून ४.७० हजाराचा मुद्देमाल लंपास केला.ग्रामपंचायत समोरील विठ्ठल (बाळासाहेब)चव्हाण व बाज रोड (महावितरण ऑफिस समोरील)राहणारे

जंगलूद्दीन पठाण यांचे ४.५० लाख रूपये रोख असा ४.७० हजार रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे.विशेष म्हणून बाळासाहेब चव्हाण यांच्या आईंना कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी पळ काढला आहे.दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

 

 

त्यानंतर पुढे महावितरण कार्यालयासमोरून बाजकडे जाणाऱ्या रोडवरील जंगलूद्दीन पठाण यांचे बंद घराचा दरवाज्या तोडून आतमध्ये प्रवेश करत तिजोरीतील तब्बल ४.५० हजार रूपये घेऊन चोरट्यांनी पळ काढला.जंगलूद्दीन पठाण कुंटुबिय हे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते.सकाळी चोरी झाल्याचे त्यांना कळाले.घरासमोरचं बाळासाहेब चव्हाण यांची चोरलेली मोकळी पाकिटे चोरट्यांनी टाकली होती.
दरम्यानच्या रस्त्यावर राजू महाजन यांच्या दुकानसमोरील सिसिटिव्हीत घटनेच्या वेळेत दोघे चोरटे जाताना कैद झाले आहेत.पो.नि.रामाघरे यांनी घटनास्थळी भेट दिली.श्वान पथकालाही प्राचारण करण्यात आले होते.  पोलीस अधिक तपास करत आहेत.
डफळापूर येथे चोरीझालेल्या ठिकाणी पो.नि.रामाघरे यांनी भेट दिली.जंगलूद्दीन पठाण यांच्या घराचा तोडलेला दरवाज्या व तिजोरीतील साहित्य चोरट्यांनी विस्कटून टाकले आहे
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.