भिंत फोडून किराणा दुकानात कार घुसली | दोघाचा मृत्यू
सांगोला,संकेत टाइम्स : भरधाव कार थेट किराणा दुकानाची भिंत फोडून आत घुसल्याने दुकानासमोर थांबलेल्या चौघा प्रवाशांना धडक दिली.त्यात आजी व नातूचा जागीच मृत्यू झाला आहे.तर पती-पत्नीसह तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.सुदैवाने दुकान मालक बाहेर असल्यामुळे थोडक्यात बचावला.
