आठवडा बाजारात भाजी विक्रीवरून हाणामारी

0

आटपाडी : आटपाडीत आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीवरून हाणामारी झाली.याप्रकरणी परस्पर विरोधी आटपाडी पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, आटपाडीचा आठवडा बाजारात भाजीपाला विक्रीवरून दोन विक्रेत्यांमध्ये किरकोळ वाद झाला,वाद वाढल्याने फ्री-स्टाईल हाणामारी झाली.याबाबत पोलीसांना माहिती मिळताच पोलीसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घेतल्याने अनर्थ टळला.

 

Rate Card

यामध्ये मनीषा अनिल सागर यांच्या फिर्यादीनुसार आरोपी मायाप्पा काळे, मंगल मायाप्पा काळे, चंद्रकांत काळे, राहुल काबुगडे सर्व रा.मापटेमळा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मायाप्पा काळे यांच्या फिर्यादी नुसार हर्षद अनिल सागर, मनीषा अनिल सागर (रा. सागरमळा) यांच्यावर असे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.आटपाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.