कोल्हापूर,संकेत टाइम्स : कोल्हापूर येथील पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमावेळी जलतज्ज्ञ जलबिरादरीचे राजेंद्रसिंह राणा यांची जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी भेट भेटली. यावेळी त्यांच्याशी जतच्या पाणीप्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा झाली तसेच महाराष्ट्र शासनाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या चला नदीला जाणूया या उपक्रमांतर्गत जत तालुक्यातील बोर नदीचा जलस्तर उंचावण्यासाठी अभ्यास व मार्गदर्शन करणेची विनंती केली. यावेळी त्यांनीही जतचा पाणीसाठा जास्तीतजास्त वाढावा यासाठी सर्वतोपरी मदत करू असा राणा यांनी शंब्द दिल्याचे आ.सावंत यांनी दिला आहे.
जत तालुक्यातील सर्वात महत्वाची नदी असलेल्या बोर नदीची सातत्याने पाणी पातळी खालवत आहे.त्यामुळे नदीचे मुख्य पाणी स्रोत कार्यान्वित करण्यापासून उप नद्या, ओढे,नाले येथून सुरूवात करण्याची गरज आहे.त्याशिवाय पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्ष लागवडीचेही अभियान राबवावे लागणार आहे.त्या अनुषंगाने जलतज्ञ रांजेद्रसिंह राणा यांच्याशी आ.सावंत यांनी चर्चा केली आहे.
जत : बोर नदीचा जलस्तर उंचावण्यासाठी अभ्यास करण्यासंदर्भात आ.विक्रमसिंह सावंत यांनी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांचीशी चर्चा केली.