अंकले येथे दुध भेसळीवर अन्नभेसळ विभागाचा छापा  

0

सांगली : अन्न व औषध प्रशासनाने जत तालुक्यातील ‍हिवरे रस्ता, अंकले येथे धाड टाकून दुध भेसळीवर कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

 

श्री. मसारे यांनी  प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, ‍हिवरे रस्ता, अंकले  येथे केलेल्या कारवाईत दुध वाहतुक करणारे वाहन क्र MH 10 DT 5509 ची तपासणी केली असता या वाहनामध्ये 160 लिटर संशयीत भेसळयुक्त दुध व 25 कि. ग्रॅ. ची एक बंग लॅक्टोज पावडर आढळून आली. दुध व लॅक्टोज पावडर यांचे नमुने विश्लेषणाकरीता घेवून उर्वरीत दुधाचा साठा जागीच नष्ट करण्यात आला व लॅक्टोज पावडरचा साठा जप्त करुन अन्न सुरक्षा अधिकारी यांनी ताब्यात घेतला.

 

अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा य मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे, अन्न सुरक्षा अधिकारी च. रा. स्वामी व गुप्तवार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अ. य. इलागेर यांच्या पथकाने केली.

Rate Card

 

नागरीकांना अन्न भेसळीबाबत कोणतीही माहिती असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाशी 0233-2602202 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा राज्यस्तरीय टोल फ्री क्र. 1800222365 वर संपर्क करुन माहिती द्यावी,  असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.