धक्कादायक | जतेत भाजपचे नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या

0
3

जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेतील भाजपचे युवा नगरसेवक विजय ताड यांची बेछूट गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.जत – सांगोला रस्त्यावर अज्ञातांनी नगरसेवक ताड यांची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार केला.

यात ताड यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेने जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.एखाद्या राजकीय नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या झाल्यामुळे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच जत पोलीसाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. ही हत्या जमिन वाद किंवा राजकीय वैमनस्यातून झाली असण्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.जत तालुका या घटनेने हादरला आहे.

 

जेष्ठ नेते स्व.शिवाजीराव ताड सर यांचे विजय ताड हे चिरजिंव आहेत.
विजय ताड हे जत नगरपरिषदेतील भाजपचे आक्रमक नगरसेवक म्हणून प्रसिद्ध होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here