दिल्ली : आरक्षणाच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणीची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे.त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रश्न अद्याप कायम आहे.या मुद्यावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.आता ही सुनावणी २८ मार्चला होणार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सुनावणीवेळी उपस्थित नसल्याने ती पुढे ढकलली आहे.
हेही वाचा..
डफळापूरचे अनिरुद्ध पुरोहित संजय घोडावत विद्यापीठात गोल्ड मेडल पुरस्काराने सम्मानित
राज्यात मागील अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आणखीन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी न होता सतत तारखा पुढे जात असल्याने सुनावणी लांबणीवर पडत चालली आहे.परिणामी ग्रामीण भागातील इच्छूकांची निराशा होत आहे.