आईला बेशुध्द केले,आणि अवघ्या‌ चार महिन्याच्या चिमुकलीचा गळा चिरला

0

नाशिक,संकेत टाइम्स : एका महिलेनेच चार महिन्याच्या चिमुकलीचा गळा चिरून हत्या,आईला बेशुध्द  केल्याच्या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. सातपूर येथील ध्रुव नगर येथे एका अज्ञात महिलेने घरात शिरून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.या घटनेबद्दल वेगवेगळे तर्क काढले जात आहे.सोमवारी २० मार्च रोजीच्या रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.या हत्येमुळे नाशिकात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

 हेही वाचा..

गोळीबाराचा थरार,कोयत्यानं हल्ला,सिनेस्टाईल घटना

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ध्रुव नगर येथे भुषण यशवंत रोकडे व युक्ता भुषण रोकडे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय राहतात. युक्ता रोकडे घरी एकट्या असतांना एक अज्ञात महिला घरात आली. त्यानंतर तिने काहीतरी बोलण्याचा करण्याचा बहाणा करत आई युक्ता यांच्या कुठलेतरी औषध लावलेला रूमाल नाकाला लावला. या रुमालावर कुठलेतरी औषध टाकण्यात आले होते. त्यामुळे युक्ता या बेशुध्द झाल्या. युक्ता बेशुध्द होताच महिलेने घरात असलेल्या चार महिन्याची बालिका दुर्गुशीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर ही महिला तत्काळ फरार झाली.

हेही वाचा..

Rate Card

अलिबागमधिल नथुराम पवार हत्या प्रकरणाचा उलघडा,एका संशयितास अटक

काही वेळाने युक्ता यांच्या सासूबाई घरात आल्या. त्या दूध घेण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. घरात येताच त्यांनी पाहिले की, सून युक्ता या बेशुद्ध अवस्थेत आहेत. तर, चार महिन्यांची दुर्गुशी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. त्यांनी जोरदार आरडाओरडा केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी रोकडे यांच्या घराकडे धाव घेतली. शेजाऱ्यांनी तातडीने भुषण रोकडे यांना व पोलिसांना फोन केला.पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले.

 हेही वाचा..

विजय ताड खूनप्रकरणी चार जणांना अटक,मुख्य सूत्रधार फरार

युक्ता यांनी सर्व प्रकार पोलिसांकडे कथन केला आहे,संशयित महिला पंजाबी ड्रेस घालून आली असल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सदर घटनेचा तपास गंगापूर पोलिस करत आहेत. दरम्यान, अवघ्या ४ महिन्यांच्या चिमुरडीची घरात घुसून हत्या करण्यात आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.पोलीसांनी गतीने तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.