सांगली : येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात
दाखल गुन्ह्यात नोटिस देऊन सोडण्यासाठी, अटक न करण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास अटक करण्यात आली. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी ही कारवाई सांगलीत केली आहे.याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
हेही वाचा-विजय ताड हत्याप्रकरण पोहचले विधानसभेत
अकबर खताळसो हवालदार (वय 53, रा.मिरज) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे याप्रकरणी तक्रारदाराने नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.तक्रारदाराच्या भावासह अन्य दोघांना दाखल गुन्ह्यात अटक न करता केवळ नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी हवालदार याने तक्रारदाराकडे 60 हजारांची लाच मागितली होती.
हेही वाचा-गोळीबाराचा थरार,कोयत्यानं हल्ला,सिनेस्टाईल घटना
त्यानंतर तक्रारदाराने याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.लाचलुचपत विभागाने हि कारवाई केली आहे.