विजय ताड हत्याप्रकरण पोहचले विधानसभेत

0

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कोसारी येथे दुहेरी खुनाची घटना ताजी असतानाच शुक्रवारी भाजपचे माजी नगरसेवक, विरोधी पक्षनेते विजय ताड यांचा निर्घृण खून करण्यात आला होता.यामुळे तालुका ढवळून निघाला होता.पोलीसांची जिल्हा स्तरावून हालचाली गतीमान झाली होती.संशयित चार जणांना पोलीसांनी ताब्यातही घेतले आहे.मुख्य सूत्रधारास अटक करावी,अशी मागणी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिवेशनात केली.जतचे हत्या प्रकरण थेट विधानसभेत पोहचल्याने यंत्रणा गतिमान झाल्या आहेत.

हेही वाचा
आ.सावंत यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हत्या प्रकरणासह जत पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.खुनाच्या घटनेने जत तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यात, शहरात गांजा मोठया प्रमाणात विकला जात आहे. तरुण पिढी वाया जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.जतला सक्षम पोलीस अधिकारी हवा, अशी मागणीही आ. सावंत यांनी अधिवेशनात केली.
Rate Card

हेही वाचा-डफळापूरात दोन घरे फोडली,पावनेपाच ‌लाखाची रोखड लंपास

दरम्यान,विधानपरिषदेत बोलताना राज्याचे माजी मंत्री,रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी जत येथील खुनाच्या घटनेकडे लक्ष वेधले. कोसारी पाठोपाठ जत येथे भाजप नगरसेवक विजय ताड यांच्या खुनाची चौकशी करावी, अशी मागणी व्यक्त करत जत तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली.दोन आमदारांनी जतच्या प्रश्नाकडे लक्ष वेधल्याची घटना प्रथमचं घडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.