माजी नगरसेविकेच्या कुटुंबावर तलवार हल्ला,पाचजण जखमी

0

सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मेटतळेतून एक धक्कादायक बातमी समोर येत असून माजी नगरसेविकेच्या कुटुंबावर तलवार हल्ला करण्यात आल्याची घटना साेमवारी रात्री घडली. याप्रकरणी पाेलिसांनी हल्लेखाेरांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

हेही वाचा-धक्कादायक | जतेत भाजपचे नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या

अधिक माहिती अशी,महाड येथून एका कार्यक्रमावरून परतत असताना माजी नगरसेविका श्रद्धा राेकडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर मेटतळे येथे दबा धरुन बसलेल्या टाेळक्याने तलवारीने हल्ला केला.अचनाक झालेल्या या प्रकाराने राेकडे कुटुंब व त्यांचे परिचित असे 5 जण जखमी झाले. या सर्वांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.

हेही वाचा-अलिबागमधिल नथुराम पवार हत्या प्रकरणाचा उलघडा,एका संशयितास अटक

Rate Card

या घटनेची माहिती कळताच पाेलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी सातारा व अन्य ठिकाणाहून पाेलिसांची महाबळेश्वरात कमुक मागवत घटनास्थळी तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत नगरसेविका राेकडे यांचे पत्नी उमेश यांनी महाबळेश्वर पाेलिसात तक्रार नाेंदवली.

हेही वाचा-सांगलीतील या तालुक्याचा डाळिंबाचा ब्रॅंड व जीआय मानांकनासाठी प्रयत्न होणार

त्यानूसार पाेलिसांनी चार प्रमुख संशयितांसह सुमारे पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एकास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महाबळेश्वरातील एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सातत्याने असे प्रकार घडत असल्याने राजकारण विकोपाला पोहचत असल्याचे समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.