आधी दिली अत्याचाराची तक्रार | दुसऱ्यादिवशी संशयित तरूणासह तक्रारदार महिला मृत्तावस्थेत आढळली

0

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील रामपूर या गावात एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली आहे. विवाहित महिलेने गळफास घेऊन तर तरुणाने विष पिऊन करून आत्महत्या केली आहे.या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.उमेश अशोक कोळेकर असं मृत तरुणाचं तर प्रियंका बाळासाहेब कोळेकर असं मृत विवाहित महिलेचं नाव आहे.घटनेमुळे जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-गुन्ह्यात मदतीसाठी ४० हजाराची मागितली लाच | एकास अटक

रामपूर येथील कोळेकर वस्ती या ठिकाणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघानी आत्महत्या केली आहे.गावातल्या कोळेकर वस्तीवरील शेतानजीक असणाऱ्या ओढ्याजवळ उमेश कोळेकर याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्याशेजारी विषारी औषधाची बाटली देखील सापडली आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रियंका बाळासाहेब कोळेकर या विवाहात महिलेने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
आज मंगळवारी सकाळी उमेश अशोक कोळेकर व प्रियंका बाळासाहेब कोळेकर हे मृतावस्थेत आढळल्याने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली.

 

हेही वाचा-विजय ताड खूनप्रकरणी चार जणांना अटक,मुख्य सूत्रधार फरार

Rate Card
घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला आहे. दरम्यान,यापुर्वी मृत विवाहित महिला प्रियांका कोळेकर हिने जत पोलीस ठाण्यामध्ये मृत उमेश कोळकर याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या सर्व घटनेनंतर या दोघांच्याही आत्महत्येचा प्रकार घडला आहे.मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर पुढील सर्व गोष्टी स्पष्ट होईल, अशी माहिती जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामागरे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.