लोकसभेच्या ६ जागा हा पक्ष लढविणार | कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन

0

कोल्हापूर: लोकसभा निवडणूकीचे ढोल वाजत असताना राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभेच्या सहा जागा लढविणार घोषणा केली आहे.सहाही ठिकाणी स्वबळावर लढणार आहोत. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोकणातील आंबा (ता. शाहूवाडी) येथे स्वाभिमानीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता अभ्यास शिबिराच्या समारोप झाला. त्याप्रसंगी शेट्टी बोलत होते.

राज्यातील हातकणंगलेसह लोकसभेच्या अन्य कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या येणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अभ्यास शिबीराच्या निमित्ताने शेट्टींनी कार्यकर्त्यांना संघटनेच्या वाटचालीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधून व भाजपाच्या आघाडीतून आपण वेगळे झालो आहोत.शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सातत्याने संघर्ष चालू आहे.
Rate Card
हेही वाचा-

 

 

यात रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे, असे ठणकावून सांगण्याची गरज आहे. मी संसदेत मांडलेला हमीभावाचा कायदा अजूनही प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचाही संघर्ष थांबणार नाही.शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे आहे. म्हणून स्वाभिमानी स्वबळावर लोकसभेच्या मैदानात ताकदीने उतरणार आहे,कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे,असे आवाहनही शेट्टी यांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.