सुखी, समाधानी जगण्यासाठी साधू, संतांचे विचार आचरणात आणा

0

जत,संकेत टाइम्स : अध्यात्म सोडून माणूस भौतिक सुखाचे मागे धावू लागला आहे. माणसाने अपार कष्ट करून भौतिक सुख मिळवले पण तरीही तो सुखाच्या शोधात फिरत आहे. सुखी समाधानी जगण्यासाठी साधू, संतांचे विचार आचरणात आणा असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

तुकाराम बाबा महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळ्याची सांगता झाली. काल्याच्या किर्तनात तुकाराम बाबा यांनी समाजातील चुकीच्या रूढी, परपंरा, अंधश्रद्धेवर हल्ला चढविला. राष्ट्रीय संत गाडगेबाबा, वैराग्यसंपन्न बागडेबाबा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजजागृतीमध्ये घालवले. समाजाने समाजासाठी काम करावे, एकमेकांना मदत करावी, तहानलेल्यांना पाणी द्यावे, भुकेलेल्यांना अन्न द्यावे, प्राणीमात्रावर दया करावी ही शिकवण दिली पण आपण आजही त्यांच्या विचाराचे आचरण करत नाही यापेक्षा मोठे दुर्देव काय. जंगलातील, वनातील प्राणिजीव शहरी भागात येऊ लागले आहेत.

Rate Card

 

आपण त्यांना भितीपोटी ठार मारतो, हुसकावून लावतो, त्यांच्यावर दया दाखवत नाही हे पूर्णतः चुकीचे आहे. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे मग अख्या आयुष्यात आपण काय चांगले काम केले याचा हिशोब आपल्याजवळ पाहिजे. सत्कर्म करा, नितीने वागा, रहा असा उपदेश तुकाराम बाबांनी आपल्या किर्तनातून दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.