विधवा भावजयीवर लग्नाचे आमिष दाखवून दिराचा बलत्कार

0

राज्यात सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत.अशातचं आता एक धक्कादायक बातमी समोर आली असून विधवा भावजयीवरलग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे.याप्रकरणी ३३ वर्षीय विधवा भावजयीने पोलीसात गुन्हा दाल केला आहे.

हेही वाचा- बालविवाह प्रकरणी पती,सासू-सासरे,आई-वडील विरोधात गुन्हा दाखल

संशयित दिराला हडपसर पाेलिसांनी अटक केली आहे.विधवा भावजयीच्या पतीचे निधन झाले आहे.तिला दोन मुली आहेत.ती माहेरी राहत होती.फेंब्रुवारी २०२१ मध्ये दिराने तिला व मुलींना संभाळतो म्हणून पुणे येथे बोलवून घेतले होते.त्यानंतर संशयित दिराने पीडितेवर बळजबरी केली.याबद्दल कोणास सांगू नको,नाहीतर मारून टाकेन अशी धमकी पिडितेला दिली.

 

Rate Card

हेही वाचा- सुनावणी लांबणीवर,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढे ढकलल्या

सातत्याने संशयित लग्नाचे आमिष दाखवून आरोपी पीडित विधवा भावजयीसोबत गैरवतर्न करत होता.लग्नाचा विषय काढल्यानंतर संशयिताने पिडितेशी वाद घालून घरातून हाकलून दिले आहे,पिडितेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.संशयित दिराला पाेलिसांनी अटक केली आहे. सहायक निरीक्षक थाेरबाेले अधिक तपास करत आहेत.

 

हेही वाचा- आधी दिली अत्याचाराची तक्रार | दुसऱ्यादिवशी संशयित तरूणासह तक्रारदार महिला मृत्तावस्थेत आढळली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.