मलेरिया कर्मचारी ते विस्तार अधिकारी असा खडतर प्रवास करणारे ; चंद्रकांत सोनवणे

0



डफळापूर : मलेरिया कर्मचारी ते विस्तार अधिकारी असा खडतर प्रवास केलेले डफळापूर येथील चंद्रकात तुकाराम सोनवणे हे विस्तार अधिकारी सांगोला पंचायत समिती सेवानिवृत्त झाले आहेत.


त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा,वडिल शिक्षक,आई पदवीधर शिक्षण घेतलेल्या,भाऊही उच्चशिक्षित अशा कुंटुबातील चंद्रकात सोनवणे हे सन 1982 ला त्या काळातील दैनिक अग्रदूत या दैनिक आलेल्या जाहिरातीमुळे शासकीय नोकरीकडे वळले.सांगली जिल्हा परिषदेमध्ये मलेरिया कर्मचारी नेमणे आहेत,अशी ती जाहिरात होती.






त्याकाळात नोकरीचे महत्व नसलेले सोनवणे यांच्या बरोबर डफळापूर मधिल अनेकजण मुलाखत देऊन आले.मात्र एकच तरूणाने अगदी काही रूपये पगार असलेले नोकरी स्विकारली ते होते.चंद्रकांत सोनवणे प्रथम सांगली जिल्हा परिषदेत त्यांना हजर करून घेण्यात आले.मात्र त्याकाळातील नव्या शासन निर्णयामुळे अतिरिक्त झालेले कर्मचारी अन्य जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले. त्यात चंद्रकां सोनवणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक करण्यात आली. 





मलेरिया कर्मचारी हे पद प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन औषध फवारणी करणे,विविध साथीच्या आजारांना अटकाव करणे,नागरिकांत जनजागृत्ती करणे अशा स्वरूपाचे होते.जिद्द,चिकाटीने चंद्रकांत सोनवणे यांनी सिधूदुर्ग,रत्नागिरी, सांगली,सोलापूर जिल्हात नोकरी केली.त्या दरम्यान त्यांना पदोन्नती मिळाली.मात्र अगदी कामाशी प्रामाणिक असलेले चंद्रकांत सोनवणे जवळपास 39 वर्षे लोकांच्या जिवनाशी निगडीत असलेल्या आरोग्य विभागात कोणताही डाग न लावता नोकरी केली.नागरिकांचे आरोग्याला महत्व देणे,वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचना,आदेशानुसार दिलेले काम काटेकोरपणे करणे हे ब्रिद चंद्रकात‌ सोनवणे यांनी आयुृष्यभर जपले.






सेवानिवृत्तीच्या अखेरच्या काळात त्यांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली होती.पंढरीच्या विठ्ठलच्या पदपस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूरच्या सांगोला पंचायत समितीत चंद्रकांत सोनवणे यांनी उत्तुंग अशी नोकरी केली.अखेर आपल्या प्रदिर्घ सेवेतून 31 मे 2021 ला ते विस्तार अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले.

Rate Card





प्रामाणिक पणाचे मोठे यश त्यांना आयुष्यात मिळाले आहे,आपल्या उच्चशिक्षित पत्नी यामुळे त्याची आपत्येही विविध ठिकाणी नोकरी करत आहेत.

दरम्यान सेवानिवृत्तीबद्दल चंद्रकांत सोनवणे यांचा डफळापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.




डफळापूर ग्रामस्थाच्या वतीने चंद्रकांत सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा.प.सदस्य अजित खतीब,माजी मुख्याध्यापक चव्हाण,शिवाजी चव्हाण,धनाजी शिंदे,बसू तेली उपस्थित होते.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.