शरिरातील सांध्यात असाह्य वेदना होतात
युरिक अॅसिडची पातळी वाढणे ही एक गंभीर समस्या आहे ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरयुरिसेमिया म्हणतात. हा एक क्रॉनिक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ज्यामुळे तुम्हाला संधिवात, किडनी स्टोन, उच्च रक्तदाब, किडनी निकामी आणि अगदी हृदयविकाराचा धोका असतो.
तुम्ही जे खाताय त्या पदार्थात पिणाऱ्या पदार्थांपासून बनवले जाते ज्यात प्युरीन नावाचे घटक समृद्ध असतात. जसजसे ते वाढत जाते, तसतसे तुम्हाला तुमच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज आणि कडकपणा यासारखी लक्षणे जाणवू शकतात.मेडिकलमध्ये युरिक अॅसिडसाठी अनेक उपचार आणि औषधे आहेत पण घराच्या घरी तुम्ही काही गोष्ट करून युरिक अॅसिड कमी करू शकता. हा साधा उपाय म्हणजे लिंबू पाणी सायन्सडायरेक्ट ( रेफ ) वर प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की लिंबूचे अनेक आरोग्य फायदे आहेत, ज्यात किडनी स्टोनचा धोका कमी करणे आणि युरिक अॅसिडची पातळी कमी करणे समाविष्ट आहे.
युरिक अॅसिड कसे करा कमी
सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या लिंबाचा रस संधिरोगाची लक्षणे कमी करू शकतो.लिंबू हा एक उपाय आहे. लिंबूमुळे युरिक अॅसिड आणि किडनी स्टोनचा धोका टाळता येऊ शकतो.तुमच्या सोयीनुसार हा यांचा वापर करावा.
युरिक अँसिडच्या पातळीवर नियंत्रण महत्वाचे
आपल्या रक्तातील युरिक अॅसिडची पातळी स्ञीयासाठी 6 mg/dL तर पुरुषांसाठी 6.8 mg/dL पेक्षा कमी असावी.यावर हे प्रमाणे गेल्यास हायपर युरिसेमियाचे लक्षण निर्माण होते. त्याची सामान्य श्रेणी 3.5 ते 7.2 mg/dL आहे.
लिंबू युरिक अँसिडला रोको शकतो.
एका अभ्यासा शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे की, लिंबाचा रस रक्तातील युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी काम करू शकतो. युरिक अॅसिडवर लिंबाचा प्रभाव अभ्यासण्यासाठी, शास्त्रज्ञांनी उंदीर आणि मानवांवर युरिक अॅसिडचा अभ्यास केला. लिंबाचा रसाच्या सेवनानंतर उंदीर आणि मानवांमध्ये युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात आल्याचे स्पष्ट झाले आहे. असे शास्ञज्ञांना अभ्यासातून दिसून आले आहे.संशोधकांचा असा विश्वास वाटत आहे की लिंबूमध्ये xanthine oxidase रोखण्याची क्षमता आहे.लिंबूमध्ये असे घटक आहेत, जे शरीरातील युरिक अॅसिड तयार करण्यासाठी मदत करतात.
युरिक अँसिड आणि लिंबूचा वापर
तुम्ही दररोज ताजे लिंबाचा रस पिऊ शकता किंवा लिंबू पाणी पिऊ शकता. पण आपण प्रमाणाची काळजी घ्यावी आणि लिंबू पाण्यात मीठ किंवा साखर वापरणे टाळावे.
संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात लोकांना दररोज लिंबाचा रस किंवा लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.
(टीप: या लेखातून फक्त माहिती दिली जाते,अशा कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्यायाचा आम्ही दावा करत नाही.नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)