अडचणीतील व्यापाऱ्यांना सरकारने मदत करावी

0
3



आवंढी,संकेत टाइम्स : सतत च्या टाळेबंदी मुळे, राज्यातील व्यापारी समाज,मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे,सांगलीतील व्यापारी बांधवांनी मोठा संयम ठेवत, प्रशासनास सहकार्य केलं आहे,यात शंका नसावी,त्यामुळं इथं रुग्णसंख्या अत्यंत नियंत्रणात आहे, पण आता मोठा आधार व्यापारी समाजास आवश्यक आहे, आम्ही खालील मागण्या शासनास करत आहोत, जेणेकरून राज्याच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही आहे,






सर्वात प्रथम,संभाव्य कोव्हीडची तिसरी लाट येण्या आधी,आणि सातत्याने टाळेबंदी ला सामोरे जावे लागू नये,यासाठी, शासन नियुक्त समिती नेमावी,जी समिती विविध व्यापारी संघटनांशी बोलून,चर्चा करून समतोल राखून उपाययोजना निश्चित करेल.

राज्य सरकारने, विविध कर,जे स्थानिक,राज्यशासित,केंद्र शासित आहेत,ते भरण्यास योग्य तो कालावधी द्यावा,मिळवून द्यावा,





स्थानिक स्वराज्य संस्थेने लॉकडाऊन च्या काळातील सर्व,व्यवसायिक घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी,तसेच व्यवसाय परवाना शुल्क माफ करावे,निशुल्क नोंदणी जरूर तर करावी,

राज्यसरकारने लॉकडाऊन काळातील वीजबिल भरण्यासाठी 6 महिन्यांची मुदत द्यावी,व्यापारी एकता असोसिएशन व सांगली जिल्हा छायाचित्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here