जतेतील तो खून नव्हे,डायव्हरचा अतिमद्य प्राशनाने मृत्यू

0
जत शहरात शनिवारी रात्री एका ३२ वर्षीय तरूणांचा अतिमद्य सेवनाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सकाळी हा खून असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती मात्र शवविच्छेदनानंतर अति मद्य सेवनाने मृत्यू झाल्याचे पोलीसाकडून प्रेस घेऊन जाहिर करण्यात आले.शनिवारी श्री यल्लमा देवी मंदिरापासून काही अंतरावर सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने (वय ३२) यांचा मृत्तदेह आढळून आला होता.

 

विजय ताड खून प्रकरणातील उमेश सावंत यांची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सचिन मदने हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. तो यल्लामादेवी मंदीराजवळ मदने वस्ती येथे राहतो.शनिवारी रात्री मदने हा आपल्या घरी नव्हता.पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांना त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला दिसून आला. यल्लमा देवीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रोडवर विहिरी पासुन अलीकडे २०० मीटर अंतरावर हा प्रकार घडला आहे.

मदने रात्रभर घरी आला नव्हता.
Rate Card

तासगाव तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू संपुर्ण बातमी वाचा एका क्लिकवर

आज रविवार सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला आहे.घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा करुन त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले. सकाळी मदने यांचा खून झाल्याचे सोशल मिडियावर फिरत होते.मात्र शवविच्छेदनानंतर त्यांचा अति मद्य सेवनाने मृत्यू झाल्याचे समोर आल्याचे पोलीसाकडून सांगण्यात आले.त्यांच्या मृत्तेदहावर अज्ञात प्राण्याने ओरखडे ओडल्याने काही जखमा दिसून आल्याचे स्पष्ट झाले आहे.पोलीसांनी गतीने तपास करत हा प्रकार समोर आणला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.