जत शहरात माजी नगरसेवक विजय ताड याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत यांना पकडण्यासाठी पोलीसांनी मोठी तयारी केली असून सांवत यांची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.त्याचबरोबर माहिती देणाऱ्याचे नावही गुप्त ठेवण्यात येईल,अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
बेंळूखीतील वृध्दाला आडव्या डोंगराजवळ मारहाण करून लुटले
दरम्यान या खूनप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे.ते अजूनही पोलीस कस्टडीत आहेत. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, दोन जादा मॅगझीन, सहा पुंगळ्या, दोन दुचाकी, दोन एअरगन असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.दि.१७ मार्च रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास जत-सांगोला मार्गावर मृत माजी नगरसेवक विजय ताड हे मुलांना शाळेतून आणण्यासाठी इनोव्हा (एमएच १० सीएन ०००२) जात असताना.संशयित बबलू ऊर्फ संदीप चव्हाण याच्यासह त्याच्या साथीदारांनी ताड यांच्यावर गोळीबार केला.
डॉक्टरांना १५ लाखांच्या खंडणीची मागणी,तिघाविरोधात गुन्हा दाखल
त्यावेळी ताड यांचा पाटलाग करत गोळीबार केला.त्यात ते शाळेजवळील मोकळ्या जागेत खाली पडल्यानंतर
त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला होता.माजी नगरसेवक ताड यांच्या खूनप्रकरणी बबलू ऊर्फ संदीप चव्हाण, निकेश ऊर्फ दाद्या मदने, आकाश व्हनखंडे, किरण चव्हाण या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातून अटक केली आहे.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक उमेश सावंत यांच्या सांगण्यावरून त्यांनी चिथावणी दिल्याची कबुली चौघांनाही पोलीसांना दिली आहे.
विजय ताड खून प्रकरणातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ
दरम्यान खून झाल्यापासून माजी नगरसेवक उमेश सावंत फरार झाला आहे.उमेश सावंत यांना पकडण्यासाठी पोलीसांनी सर्व प्रकार प्रयत्न सुरू केले आहेत.आता सावंत यांचा ठावठिकाण्याची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्तही ठेवण्यात येईल,असेही स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.
द्राक्ष व्यापाऱ्याकडील १ कोटी ९ लाख लुटले,पोलीसांनी ८ तासात चोरट्यांना पकडले