बेंळूखीतील वृध्दाला आडव्या डोंगराजवळ मारहाण करून लुटले

0

केळी विकून परत जात असताना गाडीवर बसून नेऊन आडव्या डोंगराजवळ नामदेव माळी (वय ८०, रा. बेळुंखी या वृद्धास लुटल्याची घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील बेळूंखी येथील नामदेव माळी हे केळी विकण्यासाठी जत येथे नेहमीच येतात. मंगळवारी ते केळी विकून आपल्या गावाकडे चालले होते. जत शहरातील छत्रपती संभाजी चौक येथे एका दुचाकी वाहनचालकाने
आजोबा कुठे चालला आहात असे म्हटल्यानंतर मी बेळूंखीला चाललो आहे.

 

मका | मुरघास,मकाकुटी कसे बनवतात,त्यांचे जनावरांना किती फायदे पहा व्हि’डि’ओ

तुम्हाला डफळापूरपर्यंत सोडतो म्हणून गाडीवर बसविले. रामपूर फाट्यावर दुसरा एक इसम दुचाकीवर बसला.पुढे जत शहरापासून काही अंतरावर आडव्या डोंगराजवळ गाडी थांबवून नामदेव माळी यांना जबर मारहाण करून त्यांच्या जवळील केळी विकून आलेले पाच ते सहा हजार रुपये व गळ्यातील अर्धा ग्रॅम बदाम मारहाण करून लुटले व दुचाकीवरून धूम ठोकली. यामध्ये वृद्ध नामदेव माळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जत मतदारसंघ विकास कामासाठी मोठा निधी मिळाला | या गावातील होणार विकास कामे

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.