नम्रता गुण हवाच !

0
ज्या माणसाच्या अंगी नम्रता हा गुण आहे.तीच माणसं आज सर्वगुण संपन्न आहेत.जिवनामध्ये खरे सुख म्हणजे विनय आणि तो नम्रतेमध्ये आहे.आज प्रत्येकाच्या अंगी नम्रता हा गुण असणे आवश्यक आहे.वडीलधारी,
थोरामोठ्यांचा आदर करणे हे नम्रतेचे लक्षण आहे.

 

आज माणसात अहंकारी प्रवृत्ती वाढल्याने जीवनात कटुता निर्माण होत आहे.त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात काटे नाहीत तर फुले आणावीत . नम्रता या गुणाचा अंगिकार केल्यास आपण जिवनात काहितरी करून दाखवु.जीवनात पुढे जायचे असेल तर नम्रता हा गुण महत्वपूर्ण घटक आहे.
ज्या माणसातील नम्रता संपली त्याची माणुसकी संपली असे समजावे.जगात आपले स्थान उंचावयाचे असेल तर नम्रता हा गुण  खुप महत्वपूर्ण आहे.आपली प्रतिमा निर्माण करायची असेल तर नम्रता गुण अंगी बाळगण्याची आवश्यकता आहे.आपल्याकडे काही नसु द्या फक्त नम्रता अंगि असणे गरजेचे आहे.
माणसाच्या मुखात गोडवा तसेच वागण्यात नम्रता असणे गरजेचे आहे.बाकीच्या गोष्टी आपोआप घडुन येतात.नम्रता हा गुण आपल्या आयुष्यात खुप मौल्यवान आहे.आपल्या भारताचे क्रिकेटपटू  राहुल द्रविड यांचं उदाहरण  खुप काही सांगुन जाते.राहुल द्रविड यांना बंगळुरू विध्यापिठाने डाॅक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले .परंतु राहुल द्रविड यांनी ते कृपा पुर्वक ते परत केले.पदवी परत केली .
Rate Card
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.की माझी पत्नी डाॅक्टर आहे.प्रंचड मेहनत घेवून पदवी घेतली . याबरोबर माझी आई कला शाखेची प्राध्यापिका आहे. या पदवीसाठी चिकाटीने पन्नास वर्ष वाट पाहीली.मी क्रिकेट खेळासाठी प्रचंड मेहनत घेतली .माझा इतका अभ्यास नसताना मी ही पदवी कशी काय स्विकारू .खरोखर राहुल द्रविड यांची नम्रता खुप काही सांगुन जाते
म्हणजे जीवनात नम्रतेला खुप महत्व आहे.आपण देखिल जिवनात नम्रता हा गुण अंगिकारला पाहिजे.
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी ,ता.श्रीगोदा , जिल्हा, अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.