शिवप्रताप मल्टिस्टेटचा १०० कोटीचा व्यवसाय

0
6
शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को.
ऑप. क्रेडिट सोसायटी विटा या संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात १०० कोटी व्यवसाय करून २.९० कोटी नफा मिळवल्याची माहिती संस्थापक प्रतापशेठ साळुंखे यांनी दिली.

 विटा येथील चोरीतील जप्त ७ लाख ८० हजार फिर्यादीस परत

साळुंखे म्हणाले, पतसंस्थेने सन २०२२ २०२३ या एका वर्षात १०० कोटींचा व्यवसाय केला. त्यामुळे आता ४५० कोटी व्यवसाय पूर्ण करून ५०० कोटींचे उद्दिष्ट गाठू. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी २४७ कोटी ४९ लाख, कर्जे १८१ कोटी ८५ लाख, गुंतवणूक ९० कोटी ३४ लाख,नफा २ कोटी ९० लाख, एकूण व्यवसाय ४५० कोटी, खेळते भांडवल २७५ कोटी ३८ लाख, रेशो ६७.९१ टक्के आहे. संस्थेने स्वतःची प्रशस्त आणि सर्व सोयीने सुसज्ज इमारत उभी करून कार्पोरेट व्यवस्थापन सहकारात आणून एक आदर्श निर्माण केला आहे.
ग्राहकांची संख्यात्मक वाढ करून त्यांना प्रशिक्षित करून बँकिंग प्रवाहात आणले जाईल. आता नवीन १२ शाखांना मंजुरी मिळाली आहे.त्यांचाही यावर्षी विस्तार केला जाईल,असेही साळुंखे यांनी सांगितले.
दरम्यान, संस्थेने १०० कोटी सोने तारण कर्ज वाटपाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल आणि मुख्य शाखेने १०० कोटी ठेवी पूर्ण केल्याबद्दल सर्व संबंधितांचा सत्कार करण्यात आला, संस्थेचे उपाध्यक्ष हणमंतराव सपकाळ, कार्यकारी
संचालक विठ्ठलराव साळुंखे, सर्व संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित कर्मचारी होते.

विटा | शिवप्रताप मल्टीस्टेट सोसायटीला “सर्वोत्कृष्ट संस्था” पुरस्कार | 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here