देश बचाओसाठी काँग्रेसचे सांगलीत जोरदार पोस्टकार्ड आंदोलन

0
सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व फ्रंटलस च्यावतीने मारुती चौकातील पोस्ट ऑफिस समोर पोस्ट कार्ड मोहीम आंदोलन करण्यात आले.मोदांनी हटाओ, लोकशाही बचाओ, देश बचाओ”साठी आंदोलन करण्यात आले. सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  पृथ्वीराज पाटील यांनी नेतृत्व केले. आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधान मोदी यांना पत्रे पाठवली.

जतेत अवकाळीचे ढग; वादळाच्या तडाख्याची पुढील इतके दिवस शक्यता 

आंदोलनात बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, वाढलेली प्रचंड महागाई कधी कमी करणार आहात?या देशात अनेक मोठे घोटाळे झाले आहेत परंतु ते करणारे मोकाट सुटले आहेत, त्यांच्यावर मोदी सरकार कारवाई का करत नाही? आपण २०१४ च्या निवडणुकीआधी आणि नंतरही विविध आश्वासने दिली, पण त्याची पुर्तता केली नाही. त्याचबरोबर देशात रोज मोठे घोटाळे होत असून हे घोटाळेबाज मोकाट आहेत. आपण दिलेल्या आश्वासनांची पुर्तता तर करावीच, पण घोटाळ्यांना चाप लावून घोटाळे केलेल्यांना कडक शासन करावे, अशी आमची अपेक्षा आहे,असे पत्रात म्हटले आहे.
Rate Card

धक्कादायक | चुलत दिराने आईसह दोन चिमुकल्यांचा खून करून जाळले 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.