उदमांजराची शिकार | भाटवाडी (ता.वाळवा) येथे टोळी वन विभागाच्या ताब्यात

0
3

सांगली: भाटवाडी (ता.वाळवा) येथे उदमांजराची शिकार करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिकाऱ्यांच्या 6 जणांच्या टोळीला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. टोळीविरुध्द वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.टोळीतील ६ संशयीत आरोपींना ताब्यात घेतले व असून त्यांच्याकडील मृत उद मांजरसह वाघर, विजेरी, अल्टो चार चाकी आणि १ दुचाकी गाडी इत्यादी मुद्देमाल जप्त करणेत आला.घटनास्थळी चारचाकी गाडीतून पळून जाणेच्या तयारीत असलेल्या लोकांना मोटारीसह अडवून गाडीचा तपास घेतला असता, आसनाखाली लपवून ठेवलेला वन्यप्राणी उदमांजर (इंडियन स्मॉल सिवेट) आढळला.

व्वा रे, पट्ट्या | महादेवाला नवस बोलताना अशी आरोळी कधी ऐकला का | व्हिडिओ

भाटवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील तलावाकाठी संशयित लोक वन्यप्राणी शिकारीच्या उद्देशाने फिरत असलेची माहिती वनविभागास मिळाली. महंतेश म. बगले, वनक्षेत्रपाल शिराळा, अजितकुमार पाटील मानद वन्यजीव रक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली दिपाली सागावकर, अनिल पाटील कायम वनमजूर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

• आमदाराची आई,तरीही ८० वर्षांच्या अम्मा जोरगेवार विकतात टोपल्या

• अररं शर्यत सोडून बैलगाडी पळाली ‌कुठे..

• मुलांच्या शिक्षणाची चिंता आता करूचं नका,LIC ने आणली भन्नाट योजना ! ‘असा’ होईल योजनेचा फायदा

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here